महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Taaza Page नुसार, नारायण पाटील हे आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सदस्य होते, पण आता त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण पाटील यांच्यासह करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी ग्रा.पं. सदस्य, गावचे सरपंच शरद गटात सामील होणार आहेत.

2009 मध्ये त्यांनी जनसुराज्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून ते आमदार होते .